
दोडामार्ग : तिलारी प्रकल्पातील बोडन शिरंगे बुडीत क्षेत्रातील १९९८ च्या संयुक्त मोजणी प्रस्तावा प्रमाणे घरांचा व फळझाडांचा मोबदला मिळाला नसल्याने ग्रामपंचायत शिरंगे ०१ मे रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा अंकुश लक्ष्मण गवस, विशवनाथ घाडी, व बाळकृष्ण गवस यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की सन 1998 च्या सयुक्त मोजणीप्रमाणे पुरवणी प्रस्ताव 8/80,10/80 ,व 85/86 हे मंजूर करून घरांचे व फालझाडांचा मोबदला मिळाला नसल्याने 26 जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायत बोडण येथे ग्रामस्थ उपोषणाला बसणार होतो. परंतु पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक लावून प्रश्न मार्गी लावणार असे सांगितल्यावर २६ जानेवारीचे उपोषण मागे घेण्यात आले होते.
परंतु या ४ महिन्याच्या कालावधीत भुसासंपादन व संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. पालकमंत्र्यांच्या मिटिंग मध्ये ठरवून सुद्धा संबंधित अधिकारी पालकमंत्री यांचा शब्द पाळत नाही तर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा हे काय दाद देणार, असे म्हणत १ मे २०२५ रोजी ग्रामपंचायत बोडन शिरंगे येथे उपोषण करणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.