पदापेक्षा माणुसकी मोठी | नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी घालून दिला आदर्श

Edited by: संदीप देसाई
Published on: July 19, 2023 20:06 PM
views 180  views

दोडामार्ग : सच्चा सामाजिक कार्यकर्ता कसा असावा याबाबत आजही अनेक मत मतांतरे आहेत. मात्र गरज कुणाचीही असो, संकट कुणावरही असो, नजरेसमोर असं काही घडलं तर त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या माणसांना आपणच मदत केली पाहिजे आणि माणुसकी जपली पाहिजे याचा आदर्श घालून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण होय.

 नगराध्यक्ष चेतन चव्हाण आपल्या सहकऱ्यांसह आज दोडामार्ग ते ओरोस असा प्रवास करत होते. हा प्रवास करत असताना दोडामार्ग तालुक्यातील प्रथितयश डाॕक्टर कुलकर्णी यांची कुडाळच्या दिशेने जात असताना पंक्चर झालेली कार त्यांच्या निदर्शनास पडली. आपल्या शहरातील डाॕक्टर कार पंक्चर होऊन अडकल्याचे त्यांना  थांबुन विचारणा केली असता स्पष्ट झाले. मग काय आपण नगराध्यक्ष आहोत, रस्त्यावर उतरून हवा नसलेला गाडीचा टायर कसा काढू असा विचार न करता, आपल्या माणसाला आपणच मदत केली पाहिजे या माणुसकीच्या नात्यानं स्वतः नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी डॉ. कुलकर्णी यांना टायर पंक्चर काढण्यासाठी मदत केली. सामान्य कार्यकर्ता ते नगराध्यक्ष असा प्रवास असुनही आपण जमिनीवरचाच कार्यकर्ता असल्याचं श्री. चव्हाण यांनी या आजच्या त्यांच्या कृतीतुन दाखवून दिलंय. त्यांच्या या सच्चा सामाजिक कार्याच्या कृतीतून माणुसकी धर्मच सर्वश्रेष्ठ असून अडचणीत असलेल्यांना सहाय्य करणारी शिकवण येथे अधोरेखित होत असून त्यांच्या या अशा कार्याबद्दल सर्व स्तरातून व मित्रपरिवारातून विशेष कौतुक होत आहे.