लालबहादूर शास्त्री विद्यालयात मानवी हक्क दिन

Edited by: मनोज पवार
Published on: December 10, 2024 17:53 PM
views 91  views

मंडणगड : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल ,दहागाव. या प्रशालेमध्ये १० डिसेंबर हा ' मानवी हक्क दिन ' साजरा करण्यात आला. 1948 रोजी संयुक्तराष्ट्र महा सभेने, मानवी हक्कांचा 'सार्वत्रिक जाहीरनामा' स्वीकारला. या घटनेच्या स्मरणात ' मानवी हक्क दिन ' साजरा करण्यात येतो.

 यानिमित्ताने विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक किशोर कासारे यांनी विद्यार्थ्यांमध्ये मानवी हक्कांची जाणीव वाढवणे, जागतिक शांतता प्रस्थापित करणे, शोषण , अन्याय अत्याचार, मूलभूत हक्कांचे संरक्षण कसे करता येईल ? याबाबत माहिती दिली.  सर्व भारतीयांना आपले भारतीय संविधान मूलभूत अधिकार देते. मानव म्हणून विकासाच्या समान संधी देते . त्यामुळे विविधतेत एकता आणि एकात्मता साधता येते व त्यातून मानवी विकास करता येतो, असे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक विजय खाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख मानसी पालांडे तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या  संख्येने उपस्थित होते. येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल , दहागाव. या प्रशालेमध्ये १० डिसेंबर हा ' मानवी हक्क दिन ' साजरा करण्यात आला.

1948 रोजी संयुक्तराष्ट्र महा सभेने, मानवी हक्कांचा 'सार्वत्रिक जाहीरनामा' स्वीकारला. या घटनेच्या स्मरणात ' मानवी हक्क दिन ' साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक किशोर कासारे यांनी विद्यार्थ्यांमध्ये मानवी हक्कांची जाणीव वाढवणे, जागतिक शांतता प्रस्थापित करणे, शोषण , अन्याय अत्याचार, मूलभूत हक्कांचे संरक्षण कसे करता येईल? याबाबत माहिती दिली. 

सर्व भारतीयांना आपले भारतीय संविधान मूलभूत अधिकार देते. मानव म्हणून विकासाच्या समान संधी देते . त्यामुळे विविधतेत एकता आणि एकात्मता साधता येते व त्यातून मानवी विकास करता येतो .असे त्यांनी सांगितले.  या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख  मानसी पालांडे, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.