मालवणात इंण्डेन घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 25, 2024 09:47 AM
views 219  views

मालवण : इंण्डेन घरगुती गॅस सिलेंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मालवण तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यात दिवसाला 900 सिलेंडर मागणी असताना एक लोड (270) सिलेंडर उपलब्ध होत असल्याने गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. मालवण शहरात गॅस सिलेंडर वितरित केला जात असल्याच्या बांगीवाडा या ठिकाणी गुरुवारी सकाळी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक कोंडीही झाली. वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब, डी. जानकर हेही त्याठिकाणी दाखल झाले होते. 

ग्राहकांना जलद सेवा मिळावी यासाठी प्रयत्न 

मालवणात इंण्डेन गॅस सिलेंडर भरणा करून येतात तो कंपनीचा प्लांट चाकण येथे आहे. मात्र, ते अंतर लांब होत असल्याने बेळगाव येथील प्लांट मधून गॅस सिलेंडर पुरवठा सूरू करण्यात आला. हे अंतर जवळ असल्याने लवकर ग्राहकांना सेवा मिळावी या हेतूने हा निर्णय झाला. मात्र बेळगाव येथून महाराष्ट्र सिंधुदुर्ग येथे गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या अधिक गाड्यासाठी निघालेले टेंडर प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याने काही गाड्या अजून सेवेत नसल्याने गॅस सिलेंडर पुरवठा कमी झाला. त्यावर मार्ग म्हणून चाकण येथील प्लांट मधूनही गॅस सिंलेंडर लोड मागवण्यात आले आहेत. मात्र सध्य स्थितीत ग्राहकांची मागणीही जास्त असल्याने काहीसा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र जादा गॅस सिलेंडर मागणी करण्यात आली असून येत्या दोन ते चार दिवसतात सेवा सुरळीत होईल. अशी माहिती इंण्डेन गॅस मालवण कार्यालय व्यवस्थापनाने दिली आहे.