जिल्हास्तरीय युवा उत्सव ला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद

नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: March 07, 2023 11:36 AM
views 362  views

वेंगुर्ला:

युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार च्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडे येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव ला संपूर्ण जिल्हाभरातून स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 

युवा उत्सव साजरा करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचप्राण अर्थात पाच तत्वे युवकांसमोर ठेवली आहेत ठेवली आहेत. यामध्ये विकसित भारताची निर्मिती, गुलामगिरीच्या विचारातून मुक्ती, भारताच्या महान सांस्कृतिक वारशाचा अभिमान, एकता आणि एकजूटपणा तसेच नागरिक म्हणून कर्तव्य हे ते पंचप्राण आहेत. युवकांमध्ये हे सर्व पोहोचावे आणि रुजावे यासाठी नेहरू युवा केंद्र च्या माध्यमातून देशातील बहुतांश जिल्ह्यात युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पंचप्राणावर आधारित विविध स्पर्धा या उत्सवात आयोजित करण्यात आल्या.


         युवा उत्सव देशभर साजरा करण्यासाठी काही महत्त्वाची ध्येयधोरण समोर ठेवण्यात आली असून यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव युवकांच्या प्रेरणेतून साजरा करणे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे स्वातंत्र्यसैनिक लढले त्यांच्याबद्दलची माहिती जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी, भारताची वैविध्यपूर्ण अध्यात्मिक आणि सांस्कृतिक तत्वे याबद्दल आदर निर्माण करणे, विविध प्रकारच्या युवा कलाकारांचे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समूह करणे तयार करणे आणि युवाशक्तीला त्यांची कला सादर करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे ही ध्येय धोरणे युवा उत्सवासाठी आखून देण्यात आली आहेत.


    जिल्हास्तरीय युवा उत्सव चे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नेहरू युवा केंद्राचे  जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी, जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, माजी पोलीस उप अधिक्षक दयानंद गवस, जेष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जनता विद्यालय तळवडे चे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, बँक ऑफ इंडिया चे एल.डी.एम. मुकेश मेश्राम, तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, तळवडे शिक्षण प्रसारक मंडळ चे रवींद्रनाथ परब, निवृत्त पोलिस सुधीर चुडजी आदी मान्यवर उपस्थित होते.

    मोहित कुमार सैनी यांनी प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्र युवा वर्गासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती तसेच युवा उत्सव घेण्यामागच्या उद्देश कथन केला. दयानंद गवस यांनी युवा वर्गाला मोबाईलचे चे दुष्परिणाम आणि स्पर्धा परीक्षा महत्व आणि पंचप्राण याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी युवा वर्गाला उद्योजकतेवर मार्गदर्शन करून आपल्या व्यवसायासाठी जिल्हा बँक आवश्यक ते आर्थिक सहकार्य करेल अशी युवक युवतींना ग्वाही दिली.

     यावेळी विविध  स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये बँक ऑफ इंडिया,आरोग्य विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) , उद्योजकता केंद्र  यांनी माहिती दर्शवणारे स्टॉल लावलेले होते.


विविधतेतून एकता या विषयावरती कविता लेखन, आपला निसर्ग या विषयावर मोबाईल फोटोग्राफी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला या विषयावर चित्रकला, राष्ट्र उभारणीमध्ये युवाईची भूमिका या विषयावर वक्तृत्व तसेच लोकनृत्य आणि देशभक्ती या विषयावर समूहनृत्य स्पर्धा संपन्न झाल्या.  पाचही स्पर्धांमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील २७६ युवक-युवतींनी सहभाग दर्शविला.

     कविता लेखन स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, मिलन तिरोडकर, वैभव खानोलकर यांनी, चित्रकला स्पर्धेचे परीक्षण गणेश कुंभार आशिष कुंभार, कृष्णा सावंत यांनी तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण अजित राऊळ गुरुजी, प्रा.व्ही.पी. नंदगिरीकर, ॲड. चैतन्य दळवी यांनी, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेचे परीक्षण यासीरशहा मकानदार, सौरभ आईर, ओंकार सावंत यांनी, समुहनृत्याचे परीक्षण महेंद्र मातोंडकर,संजय पाटील, विनायक ठाकर यांनी केले.


जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:

चित्रकला स्पर्धा

प्रथम: रिया अतुल सावंत (सावंतवाडी)

द्वितीय: सानिया रघुनाथ राऊळ (वेंगुर्ला)

तृतीय: कीर्ती मिलिंद तळकटकर (मळगाव)

कविता लेखन स्पर्धा

 प्रथम: अक्षय प्रशांत कानविंदे (सावंतवाडी)

द्वितीय: प्रेरणा दिलीप कांबळे (वैभववाडी)

तृतीय: मयूरी किशोर सावंत ( वेंगुर्ला )

मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा

प्रथम: गौरव प्रियदर्शन राऊळ (वेंगुर्ला)

द्वितीय: रोहित बापू जाधव (तळवडे)

तृतीय: सचिन दीपक वाघेश्री (कणकवली)

वक्तृत्व स्पर्धा

प्रथम: दिव्यता सिताराम मसुरकर (वेंगुर्ला)

द्वितीय: श्रद्धा सत्यवान मडव (कणकवली)

तृतीय: मंदार दुर्गाराम जोशी (कोनशी,बांदा) 

समूह नृत्य स्पर्धा

प्रथम: परी डान्स क्रिएशन, कुडाळ 

द्वितीय: सोमेश्वर ग्रुप,आडेली

तृतीय: न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा

           सर्व स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते चषक,प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  वेताळ प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर तर आभार अपेक्षा मांजरेकर यांनी मानले.