कणकवलीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 'तहसील'मध्ये मोठी गर्दी

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 21, 2026 11:05 AM
views 195  views

कणकवली : कणकवली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस शिल्लक असल्याने आज सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालयामध्ये उमेदवारांनी कागदपत्रांची जुळवा जवळ करतानाचे धावपळ पाहायला मिळत आहे.

अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी स्वीकारत असल्याने शेवटचे चार तास शिल्लक आहेत. अर्जासोबत विविध दाखले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत आहेत. भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेस या सर्वच पक्षाकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी  कणकवली तहसील कार्यालयात उमेदवार दाखल होत आहेत. त्यामुळे मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.