
देवगड : भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम हे जिल्हा परिषद पुरळ व कुणकेश्वर पंचायत समिती गटातून इच्छुक होते. मात्र या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी प्रामाणिकपणा प्रेम मेहनत हरले ! दबाव तंत्र जिंकले ! अशा आशयाच्या व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. संदीप साटम हे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अगदी जवळचे असल्याने इतर पक्षात जाण्याचा विषय येत नाही, परंतु पक्षाच्या इतर पदाधिकारी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना चेहऱ्यावर नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.










