
मालवण : कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मालवणच्या बोर्डिंग मैदान येथे साजरा होतं आहे. या सोहळ्याला खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, नीलम राणे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बबन शिंदे, राजा गावकर, यासंह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. काही क्षणातच केक कापून आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून 'शिवायन' हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. तुफान गर्दी करत मालवण करानी प्रतिसाद दिला आहे.