
सावंतवाडी : आंबोली कबूलयतदार प्रश्नाबाबत आंबोली तील कबूलयतदार गांवकर समन्वय व कृती समितीकडून आदी योग्य माहिती घ्यावी व मगच खासदार विनायक राऊत यांनी भाष्य कराव असं विधान आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी केल आहे. गेल्या 10 वर्षात खासदार म्हणून आंबोलीला किती विकास निधी दिला ? असा सवाल त्यांनी केला.
त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणूक ही देशात कोणाचे सरकार आणायचे यासाठी आहे. आंबोलीतील जनता मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार आहे. टीका करण्यापूर्वी 10 वर्षात खासदार म्हणून आंबोलीला किती विकास निधी दिला ? हे विनायक राऊत यांनी सांगाव. खासदारानी मतदान 10 वर्षात केलेल्या विकासाच्या नावाने मत मागायचे की स्वतः खासदार असून सुद्धा सोडवू न शकलेल्या प्रश्नासाठी मागायचे ते आदी ठरवावे. आंबोली पर्यटन वाढीसाठी खासदार म्हणून 10 केलेले एक तरी काम सांगा अस आव्हान केलं. वन संज्ञा प्रश्ना तुम्ही का नाही सोडवला ?आंबोली कबूलयतदार प्रश्न सुटावा किंवा नेमका काय प्रश्न आहे हे साधे जाणून घ्यायला तुम्ही खासदार म्हणून 10 वर्षात आंबोलीमध्ये एकदाही आला नाही. आतापर्यंत जो काही थोड्याफार प्रमाणात कबूलयतदार प्रश्न सुटला आहे तो शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा विधानसभा अध्यक्ष राजन तेली यांच्यामुळे सुटलेला आहे. त्यात खासदार विनायक राऊत यांचा काडीचाही संबंध किंवा योगदान नाही. आंबोली पर्यटन वाढीसाठी जर प्रयत्न केले असते तर आज विकासाच्या नावाने तुम्ही मत मागितली असती. मात्र, तसे न करता भावनिक व न्यायप्रविष्ठ मुद्यांच्या नावाने मत मागायची वेळ त्यांच्यावर आली आहे. आंबोली तील जनता नरेंद्र मोदी व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीशी आहे अस सौ. पालेकर म्हणाल्या.