
कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे राहत्या घरास आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे घर प्रमोद बांबर्डेकर यांचे असून ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. या घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच या घटनेचा कुडाळ पोलीस पंचनामा करीत आहेत.