घोडेमोडणी ठरली लक्षवेधी..!

Edited by:
Published on: March 31, 2024 14:39 PM
views 241  views

दोडामार्ग : साठ खेड्यांचं जागृत देवस्थान, अशी ओळख असलेल्या साटेली गावच्या श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी, देव पुरमार, देव चाळोबा देवस्थान शिमगोत्सवाची नुकतीच मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या गावच्या शिमगोत्सवात आकर्षण असलेला घोडेमोडणी उत्सव विशेष लक्षवेधी ठरला. घोडेमोडणी साठी घोडेस्वार म्हणून पुढे येणारे युवक यांना पारंपरिक पोशाख परिधान कंरून फेटा बांधून सजवण्यात आले होते. नंतर मंदिराच्या बाहेर येऊन ग्राम देवता श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी इतर देवतांना गाऱ्हाणे घालून, मंदिराला होळीला प्रदक्षिणा घालून घोडमोडणी नाचण्याचा उत्सव सुरू झाली. यावेळी रंगीबेरंगी गुलालाची उधळण करण्यात आली. 

घोडमोडणी सुरू होण्यापूर्वी शांतादुर्गा मंदिर येथे देवतांचे तीन घोडेस्वारांची तयारी पूर्ण झाल्यावर तीन घोडेस्वार तसेच गावातील ग्रामस्थ मानकरी यांनी मंदिराबाहेर येऊन देवीला गाऱ्हाणे घातले. हे देवी आज वर्षाचे घोडे आज बाहेर काढले आहेत. त्यांचे कार्य घोडमोडणी नाचण्याचा उत्सव आहे. न्या त्या देवतांच्या ठिकाणी उत्सव पार पडला कि पुन्हा सुखरूप पुन्हा घेऊन ये. जर काय अडीअडचणी ईले तर ते बाहेरच्या बाहेर दूर कर रे म्हाराजा! असे सांगून घोडेमोडणी उत्सव दुपारी दोन वाजता सुरू झाली. अनेक युवक घोडमोडणी नाचण्यात सहभागी झाले होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जयघोषात गुलालाची उधळण करत घोडमोडणी नाचण्याचा तरुणाई मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती. या तरुणाई सोबत घोडेस्वार देखील तेवढ्याच उत्साहात त्यांना साथ देत होते. विशेष साटेली गावच्या शिमगोत्सव मधिल घोडमोडणी मध्ये ख्रिश्चन मुस्लिम बांधव देखील सहभागी होतात ऐकोपाचा संदेश देतात हे विशेष आहे. आजही ही परंपरा बघायला मिळते.

घोडमोडणी नाचताना कुणाला कुठेही थकवा जाणवत नव्हता. नाचणे सुरू असताना मध्येच पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जयघोष करत गोल रिंगण घेतले जात होते. येथील कार्यक्रम पार पडला की अनेक महिला घोडेस्वार यांची ओटी भरण्यासाठी मोठ्या संख्येने  भाविक मंडळी उपस्थित होती. माहेरवाशीण महिला ओटी भरण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या.  गेल्या शिमगोत्सव लवकर आला होता या वर्षी मार्च शेवटच्या आठवड्यात आला. साटेली सातेरी मंदिर येथे घोडेमोडणी संपली की जागृत देवस्थान चाळोबा येथे तीन घोडेस्वार जायला निघाले. येथील एका नाल्यावर आले की येथून एक (मानवी घोडेस्वार) पळत सुटले. तो थेट आवाडा पाटेकर देवस्थान होळीच्या ठिकाणी गेले. ही प्रथा गेली कित्येक वर्षे जोपासली जात आहे. पूर्वी या नाल्याच्या ठिकाणी सीमेवर घोड्याला बंदुकीने मारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे तो घोडा त्या काळी पळत सुटतो, आज देखील या ठिकाणी सीमेवर घोडा आला की फटाके धमाका केला जातो नंतर अवसार आल्या प्रमाणे घोडेस्वार पळत सुटतो. त्याच्या पुढे ढोल मागोमाग गावातील युवक पळतात. हे वेगळ आकर्षक बघायला मिळते. या ठिकाणी आवाडा कोट  पाटेकर देव येथे होळी उभारली जाते या सीमेला पाय लावून घोडा माघारी फिरतो सीमेच्या  आत घोडा जावू नये यासाठी होळीच्या सीमेवर अनेक युवक मानवी साखळी करून उभे राहतात. 


चाळोबा देवस्थान ठिकाणी नवस फेड


आवाडा चाळोबा देवस्थान एक जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी नवस बोलले की देव चाळोबा पावतो त्यामुळे शेकडो भाविक देवस्थानासमोर  फेडण्यासाठी दाखल झाले होते नवस . काहींनी श्रीफळ केळी फळे तर काहीजण कोंबडे आणि बोकड घेऊन नवस फेडण्यासाठी आले. आवाडा येथील चाळोबा देवस्थान परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. हजारो भाविक गोळा झाले होते.  मुंबई चाकरमानी साटेली    गावातील ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने घोडमोडणी उत्सव पाहाण्यासाठी तसेच ओटी भरण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत चाळोबा देवस्थान येथे रंगाची उधळण करत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जयघोष करत नाचणे तसेच मधोम रिंगण घेणे सुरू होते.

आवाडा गावातील ग्रामस्थ यांनी जमलेल्या भाविकांसाठी चाळोबा देवस्थान येथे सरबत पाणी याची व्यवस्था केली होती.  चाळोबा देवस्थान या ठिकाणी बोललेले नवस फेडण्यासाठी अनेक कोंबडे, तसेच बकरे भाविकांनी येथे नवस फेडण्यासाठी बांधले होते.  रात्री उशिरा शिमगोत्सव सांगता झाली.