
रोहा : रोहा तालुक्यातील अवचित गड प्रतिष्ठान हे नेहमीच कला, क्रीडा, शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. आ. अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मागील दोन वर्षात कोरोना महामारी, निसर्ग चक्रीवादळ अशा भयानक संकटाना रायगडवासियांना सामोरे जावे लागले. अशा संकट काळामध्ये समाजातील विविध क्षेत्रात नेहमीच कार्य तत्पर असणाऱ्या व्यक्तीमध्ये संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये ज्यांच नेहमीच महत्वपूर्ण कार्य आणि उल्लेखनीय योगदान असते ते विनोदभाऊ पशिलकर यांचे.
संपूर्ण जगावर महाभयंकर मागील दोन वर्ष कोरोना रोगाने हाहाकार माजविला होता, त्या नंतर कोकणाला निसर्ग चक्रीवादळामुळे फार मोठ्या संकटाना सामोरे जावे लागले होते मात्र या संकटाच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाचे आपण काही तरी देणं लागतो, ही भावना मनाशी बाळगून सतत कार्य करणारे विनोद भाऊ पशीलकर यांनी आपत्ती ग्रस्तांना, गरजवंताना मदतीचा हात दिला. याच कार्याचे त्यांचे महत्त्व लक्षात घेता त्यांना या कोरोना योद्धा या पुरस्काराने गौरविण्यात आले.