जागतिक जलदिनी विक्रांत जोईल यांचा सन्मान...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 23, 2024 10:32 AM
views 157  views

देवगड : जागतिक जलदिना निमित्त पाणी गुणवत्तेत चांगली कामगिरी केल्याबद्दल  कातवण जलसुरक्षक विक्रांत जोईल यांचे पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. पाणी शुद्धीकरण करणे व पाणी गुणवत्ता चांगली राखण्याची महत्वाची जबाबदारी जलसुरक्षक गावामध्ये पार पाडत असतो. याच अनुषंगाने जागतिक जल दिनानिमित्त दरवर्षी पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जलसुरक्षक यांचा सत्कार पंचायत समिती देवगड अंतर्गत करण्यात येतो. यंदाचा उत्कृष्ट जलसुरक्षक म्हणून कातवण मध्ये जलसुरक्षकाचे काम करणारा विक्रांत एकनाथ जोईल याची निवड करण्यात आली आहे. या सत्कार प्रसंगी डाटा ऑपरेटर मोहीनी खडपकर व मान्यवर उपस्थित होते.