
वैभववाडी : महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनी तालुक्यातील माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे ता. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९वा.हा कार्यक्रम होणार आहे.
देश रक्षणासाठी तालुक्यातील अनेक सैनिकांनी सैन्य दलात सेवा बजावली आहे. या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी "अभिवादन भारत मातेच्या सुपुत्रांचा सन्मान माजी सैनिकांचा"या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री प्रमोद रावराणे यांनी केले आहे.