
सावर्डे : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस.बी. नलावडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "गुरु" संकल्पनेचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, गुरु गर्वाचा नाही तर ज्ञानाचा मार्गदर्शक असतो; तो आपल्या जीवनात आई, शिक्षक किंवा कोणताही हितचिंतक असू शकतो जो आपल्याला यशस्वी जीवनाची वाट दाखवतो.
प्राचार्यांनी एस. बी. नलावडे संत परंपरेचे योगदान सांगताना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनी नम्रता घोटेकर, साक्षी कुंभार, ऋतिका गायकवाड, आणि आकांक्षा डिके यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक टी. वाय. कांबळे यांनी केले. त्यांनी सांगितले की, गुरु म्हणून त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे फळ म्हणजे हेआजचे गुणवंत विद्यार्थी. सूत्रसंचालन प्रा. आवनी कदम यांनी तर आभार प्रा. दीप्ती शेंबेकर यांनी मानले.कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.