जय हनुमान मित्रमंडाळाच्यावतीने संजू परब यांचा सन्मान

दांडेलीतील 'दीपोत्सवा'चं निमित्त
Edited by: जुईली पांगम
Published on: October 27, 2022 16:32 PM
views 269  views

सावंतवाडी : आरोस - दांडेली इथं जय हनुमान मित्रमंडाळाच्यावतीने होणारा दीपोत्सव सलग 5 व्या वर्षी आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन पार पडलं. याचं औचित्य साधत प्रमुख पाहुणे लाभलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला. 

दरम्यान, मनोगत व्यक्त करताना संजू परब यांनी जय हनुमान मित्रमंडाळाच्या या दीपोत्सवाचं कौतुक केलं. स्थानिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचं ते म्हणाले. भविष्यात याहीपेक्षा गावात भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्याची जबाबदारी आपली आहे. तुम्ही कधीही हाक द्या, मी नेहमी गावासोबत असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.   

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, मळेवाड - कोंडुरा उपसरपंच हेमंत मराठे, दांडेलीचे सरपंच कृष्णा पालयेकर,  माजी पं. स. सदस्य संदीप नेमळेकर, भाजप नेते माजी नगरसेवक दिलीप भालेकर, ग्रा. पं. सदस्य निलेश आरोलकर, सत्या बांदेकर, सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप पदाधिकारी अमोल आरोसकर, पोलीस पाटील अनंत मालवणकर, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण मांजरेकर, माजी सरपंच संजय पांगम, श्री रेडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.