
देवगड : देवगड येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक (व्यव.) विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेचा १० वी व १२ वी चा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये प्रथम तीन गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष ऍड.अजितराव गोगटे , सचिव -प्रविण जोग ,शाळा समिती अध्यक्ष -प्रसाद मोंडकर ,संस्था पदाधिकारी श्री .संतोष किंजवडेकर सौ . नम्रता तावडे , .महेश रानडे यांच्या उपस्थितीत १० वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त कुमारी -वैष्णवी प्रल्हाद करंगुटकर (९४.४० टक्के ) , कुमार -श्रेयस सुधीर बापट (९४.४० टक्के ) , द्वितीय क्रमांक :कुमारी- नेहारिक चंदन घाडी (९१.० टक्के ),कुणारी -अन्वेषा संतोष किंजवडेकर (९१.० टक्के ) कुमारी- सिद्धिका निसार राऊत (९१.० टक्के )तृतीय क्रमांक : कुमार – ऋग्वेद महेश रानडे व १२ वी मधील इलेक्ट्रिकल शाखे मध्ये कुमार -गौरव राणे (६२.० टक्के ) कुमार – कौस्तुभ भोवर (५८.५० टक्के ) , कुमार -किरण राऊत (५७.१७ टक्के ) , तर इलेक्ट्रॉनिक्स शाखे मध्ये कुमार – अभिषेक राऊळ (६५.० टक्के ) , कुमार -प्रणय मोंडे (६०.५० टक्के ), कुमार -हितेश वायंगणकर (६०.० टक्के ) इत्यादी गुणवंतांचा संस्थाचालकांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला .
संस्थाध्यक्ष अजितराव गोगटे यांनी दर वर्षी इयत्ता १० वी मध्ये ९० टक्केहून जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपयाचे पारितोषिक जाहीर केले होते .चालू वर्षी वरील ६ विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक पटकावले या कार्यक्रमाला विद्यार्थी ,संस्था चालक , पालक व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते तसेच या संपुर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचे काम ज्येष्ठ शिक्षक सुनिल जाधव यांनी केले.