सातार्डा ग्रामपंचायतमध्ये माजी सैनिकांचा सन्मान

Edited by: विनायक गावस
Published on: August 21, 2023 19:10 PM
views 133  views

सावंतवाडी : स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत मेरी मिटटी मेरा देश अभियानांतर्गत पंचायत समिती सावंतवाडी येथे ग्रामपंचायत स्तरीय आणि तालुकास्तरीय आठ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते  यातील ग्रामपंचायत स्तर कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्यसैनिक आणि वीराना वंदन करण्यात आले सातार्डा ग्रामपंचायत मध्ये चार माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये आर्मी मधूननिवृत्त झालेले चंद्रकांत पवार त्यांचे भाऊ शांताराम पवार तेच गावातील माजी सैनिक सगुण गोवेकर व संतोष वेंगुर्लेकर यांचा  याशिवाय पोलीस पाटील रामदास जाधव यांचाही सरपंच संदीप प्रभू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी उपसरपंच उत्कर्षा पेडणेकर सदस्य ग्रामपंचायत जाधव वासुदेव राऊळ तसेच ग्रामसेवक सोमा राऊळ तलाठी संदीप मुळीक आदी उपस्थित होते यावेळी 75 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.


या कार्यक्रमाची सांगता सावंतवाडी येथे सावंतवाडी पंचायत समिती तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमात मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबवण्यात आला पंचायत समितीच्या जुन्या इमारतीबरोबर कर्मचारी निवासस्थाने भटवाडी या ठिकाणीही हा उपक्रम साजरा करण्यात आला. स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत मेरी मिटटी मेरा देश अभियांनांतर्गत प्रत्येकराज्यामध्ये गाव ते शहरापर्यत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी यासाठी हे अभियान ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राबविण्यात आले आहे. या अभियानांतर्गत पंचायत समिती सावंतवाडी जुने कार्यालय येथे उस्फुर्तपणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


वसुधावंदन कार्यक्रमांमध्ये पंचायत समिती सावंतवाडी कर्मचारी निवासस्थाने परिसर भटवाडी येथे अमृतवाटिका तयार करण्यात आली. यावेळी या परिसरामध्ये 75 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये साग, आवळा इ. विविध रोपांची लागवड करण्यात आली. सदरची लागवड ही कर्मचारी व अधिकारी यांच्या सहभागातून करण्यात आली. सावंतवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमांमध्ये गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक- प्रशासक तथा गट विकास अधिकारी .उपअभियंता श्री. सुदेश राणे  गट शिक्षणाधिकारी श्रीम. कल्पना बोडके- प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी. श्री. प्रशांत चव्हाण- कृषि अधिकारी श्रीम. शारदा नाडेकर-  सहाय्यक प्रशासन अधिकारीश्री. विनायक पिंगुळकर आधी सह प्रशासकीय कृषी अधिकारी बांधकाम शाखा अभियंता विस्तार अधिकारी महिला बचत गट प्रतिनिधी तसेच पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेयावेळी प्रास्ताविक गटविकास अधिकारी नाईक-  यांनी केले व आभार कृषि अधिकारी. प्रशांत चव्हाण  यांनी मानले.