
मंडणगड : तालुक्यातील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव या प्रशालेतील शिक्षिका विनया नाटेकर, यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना यांच्या वतीने गुरुसखा रामनाथ दादा मोते स्मृति पुरस्कार दिले जातात. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन 2 फेब्रुवारी 2025 रोजी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथे करण्यात आले होते.
त्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते सौ. विनया नाटेकर यांना गौरवण्यात आले. त्याचे औचित्य साधून लालबहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन ,त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्याध्यापकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक श्री. मनोज चव्हाण, श्री .जितेंद्र कलमकर, श्री. किशोर कासारे , ज्येष्ठ शिक्षिका मानसी पालांडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा दळवी,भाई गुडेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.