उत्कृष्ट अभियंता म्हणून अजयकुमार सर्वगोड यांचा सन्मान..!

न्यायाधीश सलीम शेख, न्यायाधीश सोनटक्के यांच्या हस्ते आले गौरविण्यात
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 11, 2024 06:49 AM
views 58  views

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा कणकवली तालुका बार असोसीएशनच्या वतीने उत्कृष्ट अभियंता म्हणून सन्मान करण्यात आला. कणकवली न्यायाधीश सलीम शेख आणि न्यायाधीश सोनटक्के यांच्या हस्ते सर्वगोड याना गौरविण्यात आले. या सत्कराने कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड भारावून गेले.या सत्कारानंतर कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत...पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढु नये असे लहानपासुन माझे आई वडिल माझ्या मनावर मला बिंदवत  होते. आजपर्यंत कोणत्याही कारणास्तव मी पोलीस स्टेशन किंवा कोर्टामध्ये जाण्याचे टाळत आलो . हे केवळ आई वडिलांच्या संस्कारामुळेच. परंतु शासकिय सेवेत अभियंता म्हणुन काम करत असताना कामानिमित्त पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये जाण्याचा प्रसंग वारंवार आला तरी सुध्दा कमीत कमी वेळा जाण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न केला.    

मित्रहो भारतीय लोकशाहीमध्ये न्यायालय न्यायव्यवस्था अंत्यंत महत्वाचा घटक मानला जातो.लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणुन न्यायव्यवस्थेकडे पाहिले जाते.सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जिल्हा न्यायालय आणि कणकवली ‍ न्यायालयामध्ये माझ्यासारख्या अधिकाऱ्याचा  आतापर्यंत या जिल्हयामध्ये दोन वेळा सत्कार आणि सन्मान झालेला आहे. हे माझ्यासाठी अंत्यंत महत्वाची आनंदाची आणि निश्चितपणाने अभिमानाची व कौतुकास्पद गोष्ट असल्याच सर्वगोड यांनी सांगितलं.