देवगड मेडिकल फाऊंडेशनला योगदान देणाऱ्यांचा सन्मान...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 03, 2024 11:04 AM
views 382  views

देवगड : देवगड येथील रुग्णांना अधिकाधिक उच्च दर्जाच्या वैद्यकीय चाचण्या आणि तपासणी व मार्गदर्शन देण्याचा गेली कित्येक वर्ष उपक्रम देवगड येथील मेडिकल फाउंडेशन तर्फे चालू आहे. कोणत्याही संस्थात्मक प्रगती आणि रुग्णांभिमुख व्यवहार हे त्या ठिकाणच्या सेवा मार्गावर अवलंबून असतात. हे लक्षात घेऊन देवगड मेडिकल फाउंडेशन मध्ये गेली पंधरा वर्षे पेक्षा अधिक ज्यांनी यशस्वी योगदान दिले आहे.आणि जे देवगड मेडिकल फाउंडेशनचे आधारस्तंभ आहेत असे प्रसाद कदम आणि कृष्णा पेंडुरकर व शकूर पीर खान यांचा डॉ. सुनील आठवले व डॉ. मंजुषा आठवले यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

भविष्यात अधिकाधिक रूगणानुभिमुख सेवा एक परिवार म्हणून देण्यासाठी आपले योगदान नेहमीच राहील असे .प्रसाद कदम व कृष्णा पेंडूरकर यांनी व्यक्त केले. शकुर पीर खान हे डीएमएफचे सर्वात अनुभवी आणि जुने कर्मचारी असल्यामुळे नवीन पिढीला त्यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. या वेळी देवगड मेडिकल फाउंडेशनच्या कर्मचारी वर्ग तसेच ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे डॉ. तन्मय आठवले व डॉ. रिया आठवले उपस्थित होत्या.