कोलझरमध्ये विरपत्नी, विर माता- पितांचा सन्मान

Edited by: संदीप देसाई
Published on: August 14, 2023 20:15 PM
views 244  views

दोडामार्ग : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मेरी मिट्टी मेरा देश या अभियान अंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोलझरच्यावतीने गावातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता v विरपिता आणि माजी सैनिक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


    आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत कोलझर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुजल सूर्यकांत गवस यांच्या उपस्थितीत वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच माजी सैनिक यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. देश रक्षणांसाठी गावातील वीरांनी दीलेल्या बलिदानापोटी अभिवादन करण्यात आले. तर देशसेवा बजावणाऱ्या माजी सैनिकांना सुद्धा सलाम करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य रोहन देसाई यांनी केले. आभार उपसरपंच श्री राणे यांनी मानले. सदर कार्यक्रमास कोलझर, उगाडे शिरवल मधील सर्व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक नामदेव परब व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.