सन्मान दशावतार कलावंतांच्या मुलांचा ! | 'पिंडदान' या दणदणीत नाट्यप्रयोगाच आयोजन

Edited by: विनायक गावस
Published on: August 31, 2023 22:20 PM
views 279  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघ, सावंतवाडीच्या वतीनं शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी माऊली मंदिर इन्सुली येथे सायं. ठीक ५:३० वाजता मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत १० वी व १२ वी पास तसेच विशेष नैपूण्य प्राप्त दशावतारी कलाकारांच्या मुलांचा सत्कार सोहळा व सावंतवाडी तालुक्यातील ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा सन्मान सोहळ्याच आयोजन करण्यात आले आहे. याच विशेष आकर्षण म्हणजे रात्रौ ६:३० वाजता सावंतवाडी तालुक्यातील संयुक्त दशावतारी कलाकारांच्या संचात महान पौराणिक "पिंडदान" हा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे.

या नाट्यप्रयोगात दशावतारतील नटसम्राट नाना गांवकर, दादा राणे -कोनस्कर, उदय राणे कोनस्कर, जगदीश मोरजकर, बंटी कांबळी, देवेश कुडव, श्रीराम साहील, तुषार बांदेकर,किरण नाईक, संतोष मेस्त्री, प्रवीण गांवकर, मंगेश गावडे, पिंटो दळवी, मुकुंद परब, तेजस सोमण, बाबलो गांवकर यांसह संगीत साथ हार्मोनिअम वादक मंदार जोशी, बाबल गांवकर, पखवाज वादक मंदार सावंत, कौशल मेस्त्री, तालरक्षक शंकर गांवकर आणि युवा झांजवादक संतोष गुडूळेकर साथ देणार आहेत. याप्रसंगी नाट्यरसिकांनी उपस्थित रहावं व याचा लाभ घ्या असे आवाहन सावंतवाडी तालुका दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघ सावंतवाडी यांनी केले आहे.