कोकण रेल्वेच्या टीसीचा प्रामाणिकपणा...!

१ लाख रुपये आणि लाखो रूपयांचे दागिने असलेली बॅग प्रवाशाला केली परत
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 23, 2023 11:06 AM
views 770  views

कणकवली : मुंबईहून येणाऱ्या सावंतवाडी-तुतारी एक्सप्रेसमधील स्लीपर कोच डब्यात रेल्वे प्रवाशाने विसरून गेलेली बॅग कोकण रेल्वेचे टिसी यांना बॅग मिळतात टी सी विठोबा राऊळ, मिलिंद राणे, सदानंद तेली, नंदू मुळे, अजित परब या सर्वांनी या बॅगच्या मालकाचा शोध घेतला असता ते आढळले नसल्याने ही बॅग रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली. सदरच्या या बॅगेत सुमारे १ लाख रुपये व मौल्यवान वस्तू होत्या. टीसी विठोबा राऊळ यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल कोकण रेल्वेची प्रतिमा उज्वल केली असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. 

      प्राप्त माहितीनुसार, २० मार्च  रोजी दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसमध्ये ड्युटी करत असताना टीसी विठोबा राऊळ यांना स्लीपर कोचमध्ये एक सुटकेस दिसून आली. सदर बॅगेसंबंधी चौकशी केली असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सदर बॅगेत मिळालेल्या आधारकार्डवरून सदर प्रवाशाचा पीएनआर क्रमांक शोधून काढला. तसेच विलवडे स्टेशन मास्टर यांच्याशी संपर्क करून प्रवाशाची माहिती मिळवली. या बॅगेमध्ये सुमारे १ लाख रूपये व मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याचे त्यांना सांगितले.

     सदरील बॅग टीसीनी आरपीएफ कणकवली यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी विठोबा राऊळ, मिलिंद राणे, सदानंद तेली, नंदू मुळे, अजित परब, अटेंडंट तानावडे उपस्थित होते. या घटनेतील प्रसंगावधान व प्रामाणिकपणामुळे रत्नागिरी कोकण रेल्वेची प्रतिमा उज्वल केली आहे, अशी पोचपावती इतर प्रवाशांनी दिली.