
वैभववाडी : कोकीसरे बेळेकरवाडी येथे रस्त्याच्या कडेला सापडलेला ७० हजार रूपये किमंतीचा आयफोन आदित्य प्रमोद मोहीते या सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने पोलीसांकडे जमा केला. त्याच्याच हस्ते तो फोन मालक अनिल यमकर याच्याकडे सुपुर्द केला. आदित्य यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीसांनी त्याच कौतुक केले.
सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य (सध्या रा.कोकिसरे खांबलवाडी,) मुळ सांगली पलुस हा विद्यार्थी शुक्रवारी सायकांळी चार पाच वाजण्याच्या सुमारास खांबलवाडीकडुन वैभववाडीकडे येत होता. शांतीनजीक पुलानजीक त्याला रस्त्याकडेला आयफोन दिसूनआला. त्याने तो फोन घेतला आणि लगत असलेल्या पोलीस ठाण्यात नेऊन दिला. त्यानंतर पोलीसांनी फोन तपासला असता त्यामध्ये सीमकार्ड नसल्याचे दिसुन आले. त्यामुळे तो आयफोन नेमका कोणाचा हे शोधणे कठीण झाले. दरम्यान आज दुपारी अनिल दशरथ यमकर रा.असळज ता.गगनबावडा हा तरूण आपला आयफोन हरविला असल्याचे सांगत वैभववाडीत आला होता. त्याला माहीती मिळाल्यानंतर तो पोलीस स्थानकात आला.त्याने फोनची ओळख पटवुन दिली.याशिवाय खरेदीची मुळ पावती पोलीसांना दाखविली.पोलीसांनी पोलीस स्थानकात फोन जमा करणाऱ्या सांगुळवाडी महाविद्यालयाच्या त्या विद्यार्थ्याला बोलवुन घेतले.त्यांच्याच हस्ते तो फोन त्या तरूणाकडे सुर्पुद करण्यात आला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील,पोलीस हवालदार नितीन खाडे,पोलीस कर्मचारी धनाजी धडे उपस्थित होते.