ईमान कामाशी | नात एसटीशी

Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2023 11:10 AM
views 258  views

सावंतवाडी : सध्या सावंतवाडी- नृसिंहवाडी एसटी बसच्या चालकाचा एसटी बस स्वच्छ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण, जनसामान्यांच्या या लाल परीकडे कधी लक्ष दिलं तर ठीक नाहीतर चाललंय ते बर, अशीच काहीशी अवस्था एसटीची आहे. पण, ज्या एसटीवर आपलं कुटुंब चालतं, जिथं आपण काम करतो तिथं प्रामाणिक राहायचं असाच संदेश या व्हिडिओतून मिळत आहे. 

सावंतवाडी आगाराची गाडी नृसिंहवाडी आगारात पोहचल्यावर बस  चालक अमोल भिरवंडेकर खाजगी वाहनाप्रमाणे त्या बसची धुवून, पुसून  साफसफाई करताना दिसत आहे. आपण ज्या रथाचे सारथ्य करतो तो रथ स्वच्छ करण्याच काम तो करताना दिसत आहे. त्याक्षणी एका नागरिकान याचा व्हिडिओ करत तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय. यात हा चालक आपण सावंतवाडी आगारातील असल्याचे सांगत आहे. त्याची ही कृती अनेकांना भावली असून लालपरीवर प्रेम करणाऱ्यांची मन जिंकायच काम या चालकान आपल्या कृतीतून केलं आहे.