
सावंतवाडी : भैरववाडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही घरगुती गणेश मखर सजावट स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक उत्साही ग्रामस्थांच्या पुढाकाराने होणारी ही स्पर्धा परिसरातील गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
या प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून वाडी-वाडींतील जवळीक वाढविण्याच्या हेतूने यावर्षी या स्पर्धत आजूबाजूच्या वाडींचा म्हणजे भंडारटेम्ब, गोसावीवाडी आणि डंगवाडी या वाडींचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच महिलावर्गासाठी यावर्षी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसोबतच विशेष पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी इच्छुकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.