गृहमंत्री अमित शहांनी घेतलं 'लालबागचा राजा'च दर्शन

हे माझं भाग्य : मंत्री दीपक केसरकर
Edited by: विनायक गावस
Published on: September 24, 2023 15:24 PM
views 88  views

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईतील सुप्रसिद्ध 'लालबागचा राजा'चे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंगल प्रभात लोढा, भाजप नेते विनोद तावडे, खा. मनोज कोटक, खा. पूनम महाजन, आ. आशिष शेलार आदी उपस्थित होते.

त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबई विमानतळावर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. यानंतर अमित शहा यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध 'लालबागचा राजा'चे सपत्नीक दर्शन घेतले.

अमित शहा हे भाविक आहेत. गणेशोत्सवात मुंबईत आल्यावर ते लालबागचा राजाच दर्शन घेतात. तर कोल्हापूरला आल्यावर अंबाबाईच दर्शन घेतात. या दोन्ही ठिकाणचा पालकमंत्री मी आहे हे माझं भाग्य आहे. त्यामुळे गणराय, महालक्ष्मीची सेवा करायची संधी मिळते‌. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अमित शहा यांच्यासोबत दर्शन घेण्याची संधी मिळाली अशी भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.