
सिंधुदुर्गनगरी : गृहमंत्री अमितशहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानस्पद वक्तव्य केल्यामुळे देशाची माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी करत बहुजन समाज पार्टीच्यावतीने सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन राष्ट्रपती महोदयांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले.
जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, गेल्या 5000 वर्षांपासून आपल्या देशातील सुरु असलेल्या मनुवादी व्यवस्थेमुळे आपल्या देशातील नागरिकांचे शोषण होत आहे. अशा समाजात बाबासाहेब जन्माला आलेत त्यांनी या मनुवादी व्यवस्थेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी काय परिश्रम घेतले. काय-काय हाल अपेष्ठा सहन केल्या. हा इतिहास या देशातील सर्व नागरिकांना माहीत आहे. आणि संविधानाच्या माध्यमातून या समाजाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, दर्जाची व संधीची समानता. राष्ट्राची एकता आणि एकात्मता, बंधुभाव निर्माण होईल असे संविधानात लिहीले. वर्ण व्यवस्था, जुलमी मनुवादी व्यवस्था मोडून या देशातील प्रत्येक नागरिकाला समान केले.
भारतातील संपूर्ण नागरिकांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेल्या हक्क अधिकारामुळे जिवंतपणे याच जन्मात स्वर्ग मिळाला. त्यामुळे आंबेडकर यांचं नाव घेणं हे पॅशन आहे. (अभिमान आहे) अतिशय आवड आहे. हे सर्व माहीत असून सुद्धा दि. 17/12/2024 रोजी संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संसदेत बोलताना.
गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीव पूर्वक आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेची थट्टा उडवत "आज आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणण्याची फॅशन झाली आहे." एवढं आंबेडकर यांचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर, सात जन्म स्वर्ग प्राप्त झाला असता असे वक्तव्य केलं." तीव्र भावना आहे. त्यामुळे संपूर्ण देश त्यांचं आदराने नाव घेतात. त्यांचा सन्मान करतात. सम्पूर्ण देशातील नागरिकांच्या हृदयात बाबासाहेब आहेत. भारतीय संविधानाने धर्मस्वातंत्र्याचा व अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे घ्यायचं आहे आणि किती वेळा घ्यायचा हा ज्याचा- त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. त्यामुळे अबिडकरांचं नाव ययेणं बंद करा, आणि देवानं नाव या अश्या अपनि अप्रत्यक्ष बोलणे अत्यंत निंदनीय आहे.
त्यांच्या मते लोकांनी आंबेडकर यांचं नाव घेणं बंद करावं आणि देवाचं नाव घ्यावं. म्हणजे ज्या व्यक्तीने भारतीय जनतेला याच जन्मात स्वर्ग तयार करून दिला. त्यांचं नाव घेणं बंद करावं आणि देवांचे नाव घ्यावं असा त्या वक्तव्याचा अर्थ निघतो. या वक्तव्यातून अमित शहा यांचा खरा मनुवादी चेहरा जनतेला दिसला त्यांच्या पोटातलं जहर ओठांवर आलच तसेच त्यांच्या मनातील आंबेडकरांबद्दल व आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेबद्दलचा राग चीड द्वेष स्पष्ट दिसून पडला. त्यामुळे सम्पूर्ण भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
अमित शहा यांनी बाबासाहेब यांच्यामुळेच देशातील नागरिकांना जिवंतपणातच स्वर्ग मिळाला. आणि आपण संविधानाचं पालन प्रामाणिकपणे केलं तर अनंत पिढ्यांना हा स्वर्ग मिळेल असं म्हणत जाहीर माफी मागावी. व पश्चताप म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष पि.के चौकेकर, जिल्हा प्रभारी सुधाकर माणगावकर, जिल्हा महासचिव आनंदकुमार धामापूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष नरेंद्र पेंढुरकर, दुलाजी चौकेकर,विजय चौकेकर, चांदणी कदम, अनंत चौकेकर आदी उपस्थित होते.