
देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत येथे हर घर तिरंगा अंतर्गत मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ कर्मचारी शिपाई अनंत सोहनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करण्यात आले यावेळी नगरसेवक, प्रशासकिय अधिकारी, नगर अभियंता व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या हरघर तिरंगा उपक्रमा अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत सर्वत्र ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानुसार देवगड पंचायत समिती येथे १४ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहणाचा मान शिपाई अनंत सोहनी यांना मिळाल्याने नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.तर मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी ध्वजारोहणाचा मान दिला त्या बद्दल अनंत गणपत सोहनी यांनी आभार व्यक्त केले.