अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारची धडक !

दुखापत नाही ; वाहनाचं मोठं नुकसान
Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2023 14:41 PM
views 1084  views

सावंतवाडी : अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या चार चाकी वाहनाने समोरील चार चाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळच्या सुमारास नेमळे ब्रिज येथे घडला.

दरम्यान, सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.