
देवगड : महाराष्ट्रात पहिल्या इयत्तेपासून हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही.आणि अशी सक्ती कोणी करायचा प्रयत्न केला तर राजसाहेबांच्या आदेशानुसार तालुक्यात मोठा संघर्ष उभा केला जाईल असा इशारा संतोष मयेकर यांनी दिला.
देवगड तालुक्यातील एकाही शाळेत हिंदी भाषेत शिकविले जाणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ. हिंदी भाषा शिकविण्यासाठी हिंदी शिक्षक म्हणजे परप्रांतीय भरती केली जाणार, येथे आधीच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा विद्यार्थी संख्येविना ओस पडत चालल्या आहेत, मग हे सर्व कोणासाठी चालले आहे, याचा विचार जनतेने करावा. असे देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.