साळशी विद्यालयात हिंदी दिन उत्साहात..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 16, 2023 12:58 PM
views 118  views

देवगड : १४  सप्टेंबर हा ‘हिंदी दिवस’ माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे हर्षउल्हासात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, सहाय्यक शिक्षक श्री.मराठे व साटम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.

यावेळी शाळेच्या सुमन लब्धे, मधुरा नाईक, केतकी साळसकर, दिव्या गांवकर या विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाचे महत्त्व व ‘हिंदी  भाषेविषयीची आवड’ या विषयी आपले विचार मांडले. शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री. मराठे व साटम सर यांनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले विचार हिंदी भाषेत मांडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक तथा हिंदी अध्यापक माणिक वंजारे यांनी हिंदी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या ओघवत्या भाषेत हिंदी दिवसाचे महत्त्व, साजरा करण्याचे कारण, जगभरातील या भाषेचे स्थान याविषयी विचार अनेक कविता, शेरो-शायरी आदितून विचार व्यक्त करताना संपूर्ण वातावरण हिंदीमय झाले होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमन लब्धे हिने केले.