कुडाळ हॉटेलमधील 'त्या' आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा | मनसेची मागणी

Edited by:
Published on: June 23, 2023 20:32 PM
views 188  views

कुडाळ : कुडाळ मधील "त्या" आत्महत्या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीची मागणी मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये अलीकडेच मुंबई येथील विवहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सदरची महिला मुंबईहून कुडाळच्या त्या हॉटेल मध्ये नेमक्या कोणत्या कारणासाठी आलेली होती ? तिच्या शेजारच्या रूम मध्ये असणारे ते दोघे युवक यांचा तिच्याशी नेमका कोणता संबंध होता ? या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहत असून संपूर्ण प्रकरण संशयास्पद वळणावर असल्याचे नमूद करत "आत्महत्या की घातपात"  यापेक्षा  प्रकरणाशी संबंधित रॅकेटचा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा याकडे लक्ष वेधले आहे.