
सावंतावडी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. सार्वजनिक मंडळ लाखो रुपयांची बक्षीस लावून उच्च न्यायालयाने उंचीचे मर्यादा तसेच वयोगटाची मर्यादा घालून दिली असताना आदेशाचा भंग काही मंडळ करत असतात. जादा थर लावून युवक दहीहंडी फोडताना थर कोसळल्याने जखमी होतात, मृत्युमुखी पडतात किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येते. आनंदाच्या काळामध्ये दुःखाची लाट कोसळ्याने कित्येक युवकांचे कुटुंब उध्वस्त होते. त्यामुळे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अश्या प्रकारची सूचना व नोटीस सिंधुदुर्ग जिल्हा व सार्वजनिक मंडळांना तसेच राजकीय पक्षांना नोटीस बजावुन अंमलबजावणी करावी अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या दुर्घटनेमुळे काही कुटुंबाला आर्थिक संकटातून जावे लागते. कमावता मुलगा असेल तर त्या युवकाच्या पत्नीला व त्यांच्या आई-वडिलांना दुःखाच्या प्रसंगामध्ये आयुष्य भर राहावे लागते. शिक्षणासाठीची मुलांची स्वप्ने अपूर्ण राहतात. यासाठी काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाच सरकार असताना कित्येक मृत्युमुखी व अपंगत्व आलेल्या युवकांच्या आई-वडिलांनी सरकारकडे निवेदन देऊन सुद्धा सरकारने या उंचीची मर्यादेची दखल सरकारने न घेतल्याने काही पालकांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाने महाराष्ट्रामध्ये दहीहंडी फोडण्याचे सार्वजनिक मंडळ सर्व पक्षाच्या व्यक्तींसाठी दहीहंडी फोडण्यासाठी उंचीची मर्यादा तसेच दहीहंडी फोडण्यासाठी वयोमर्यादा घालून दिली आहे. आजकालचे तरुण उत्साही मंडळांनी तसेच विविध पक्षाच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दक्षता न घेता उत्साहाच्या वातावरणात उंच थर लावून तसेच जीवघेणे प्रसंग घडतात त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे असं मसुरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.