
दोडामार्ग : हेवाळे गावच्या श्री सातेरी मायगवस देवतांचा काही अपरिहार्य कारणामुळे राहिलेला न्हावण कार्यक्रम उद्या शनिवार २९ मार्चला सायंकाळी होणार आहे.
सायंकाळी ५.०० वाजल्यापासून चव्हाटा मंदिर येथे देवतांची ओटी भरणे व न्हावण कार्यक्रम सुरु होणार आहे. सर्व भक्त गण व माहेर वासिणिनी ओटी भरण्यासाठी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर त्यानंतर दरवर्षी प्रमाणे रायमंदिर मुख्य ग्रामदेवता व मंदिर ठिकाणी पालखी सोहळा पार पडल्यानंतर रात्री गावातील युवकांचा सामाजिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
तरी ग्रामस्थ व भाविक तसेच माहेरवाशीन यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेवाळे ग्रामस्थ यांनी केले आहे. यावेळी पालखी सोहळा पार पडल्यानंतर लगेचच नाटकाला सुरुवात होणार आहे. असेही नमूद करण्यात आले आहे.