चराठ्यातील हेमांगी मेस्त्री विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज

राष्ट्रवादीच्या वतीने शुभेच्छा
Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 18:41 PM
views 342  views

सावंतवाडी : तालुक्यातल्या चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या प्रतिभावान खेळाडूने पॉवर लिफ्टींग, वेट लिफ्टिंग, गोळा फेक या क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर प्रथम प्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हेमांगीची कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी तिला भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच हेमांगीला प्रोत्साहन देणारे तिचे वडील गजानन मेस्त्री यांचेही सौ. अर्चना घारे यांनी अभिनंदन केले.

आपल्या प्रतिभेच्या बळावर हेमांगीने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करावीत अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, चराठा ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, अल्पसंख्याक सेल महिला तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, विलास सावळ,इफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, आनंद गावडे, विनायक परब आदी पदाधिकारी उपस्थित होते