कारिवडेच्या निराधार वृद्ध दांपत्यास 'सामाजिक बांधिलकी'चा मदतीचा हात!

इतरांनाही मदतीला पुढे येण्याचं केलं आवाहन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 07, 2023 17:42 PM
views 309  views

सावंतवाडी : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हात फॅक्चर झाल्याने सावंतवाडी उपजिल्ह  रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेली निराधार वृद्ध महिला तारामती शेटकर राहणार - कारिवडे - कुंभारवाडी ही उपचार घेऊन आपल्या घरी परतली. त्यावेळी सामाजिक बांधिलकी संघटनेच्या माध्यमातून या दांपत्यास काही गृहपयोगी वस्तू व खाद्यपदार्थ देण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सोमवारी सदर दांपत्याला घरात खायला काही नाही म्हणून नाईलाज असतो सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांना फोन करावा लागला सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सातत्याने अनेकांचे अश्रू पुसणाऱ्या या संघटनेचे पदाधिकारी संघटनेच्या माध्यमातून तात्काळ एकत्र आली व मंगळवारी तिच्या राहत्या  घरी जाऊन सामाजिक बांधिलकी टीमने सदर दांपत्याची भेट घेतली व दोन महिने पुरेल असे सर्व प्रकारचे राशन व काही औषध पाण्यासाठी आर्थिक मदतही केली. 

   तारामती शेटकर (वय ७१वर्ष) व हरिश्चंद्र शेटकर (वय ८१ वर्षे)  या निराधार दांपत्याची एकूण परिस्थिती अत्यंत हलाक्याची आहे. जेवणासाठी राशन व औषध- पाण्यासाठी  त्यांच्याजवळ एकही पैसा नाही. सदर दांपत्य अत्यंत कठीण परिस्थितीत आपले  जीवन जगत आहेत.

 दरम्यान,  सामाजिक बांधिलकीने त्यांची दखल घेऊन शक्य होईल तेवढे  सहकार्य करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

 समाजातील दानशूर व दात्यानी या निराधार, वृद्ध दापत्यांस मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. 

 सावंतवाडी शहरातील सावंतवाडी शहरातील  भटवाडी, सामाजिक बांधिलकी संघटना व राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळचे अध्यक्ष बंटी माठेकर या सर्वांच्या माध्यमातून शेटकर दांपत्यास राशन व आर्थिक सहाय्य करण्यात आले तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर यांच्याकडून मायेची उब देणार ब्लॅंकेट देण्यात आले. यासाठी सामाजिक बांधिलकीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर ,समीरा खलील, रवी जाधव,  प्रा. रुपेश पाटील, किर्ती बोंद्रे , अशोक पेडणेकर, प्रा. सतीश बागवे, हेलन निब्रे, ॲम्बुलन्स चालक लक्ष्मण शिरोडकर, आमिन खलील, गगन ग्रास, अजय कोळंबेकर, बंड्या केरकर, बंटी माठेकर, वासुदेव खानोलकर, मंथेश पडते या सर्वांनी या उपक्रमात मोलाचा सहभाग दर्शविला.

तर सामाजिक बांधिलकीच्या  समीरा खलील यांनी निराधार वृद्ध दांपत्यांना पेन्शन मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढील नंबरवर संपर्क साधावा.

कॉल - 94052 64027 

गुगल पे नंबर - 95520 12651 (रवींद्र जाधव)