
वेंगुर्ला : शिरोडा केरवाडा येथील विनोद भगत यांचे घर पावसाळ्यात पडल्यामूळे त्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान याबाबत माहिती मिळताच दीपक केसरकर मित्रमंडळ व वेंगुर्ला तालुका शिवसेना यांच्या वतीने त्यांना नवीन घर उभारण्यासाठी ५० हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, कोस्टल भागाचे तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, माजी उपसरपंच रवी पेडणेकर, ग्रा.सदस्य प्रथमेश बांदेकर, दत्तगुरू परब, दिलीप मठकर, तातोबा चोपडेकर, दिलीप नाईक, संजय ऊगवेकर, संजय धुरी,आशिर्वाद शेलटकर, नितीन तारी, विद्याधर मसुरकर,अविनाश तुळस्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. याबद्दल दीपक केसरकर मित्रमंडळ व वेंगुर्ला तालुका शिवसेनेचे भगत कुटुंबिय व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.