
सावंतवाडी : शिपवर गणेश उत्सव साजरा करून त्या उत्सवात जमलेल्या देणगीतून माऊली मतिमंद निवासी विद्यालयातल्या ३२ विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चेतन कोचरेकर, रुची कोचरेकर, प्रतीक पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत काळे सर यांनी केले व विद्यालयाची व विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला माऊली मतिमंद व कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रतीक पाटील यांचे खुप सहकार्य लाभले. माऊली मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सेलिब्रेटी एजचा राजा ग्रुपचे आभार मानले.










