
मालवण : कोकणात शेती मध्ये परस बागेत करतात. परस बाग म्हणजे साधारण २/४ गुंठा मध्ये जी परस बाग पावसानंतर करतात. अशा महिला कुटुंबातील लोकांना पुरून जे उरेल ते गावातील बाजारात विकून काही पैसे मिळवतात. या मध्ये मिरची, वाली, वांगी, मका,, झेंडू, मुळा, लाल भाजी, मका, भेंडी, भोपळा, अशी मिश्र पिके ,एकत्रित घेतली जातात. गोठ्यातील शेणखताचा व गरजे प्रमाणे रासायनिक खते वापर होतो.
अशा शेती करणाऱ्या महिलांना रोटरी क्लब माहीम मुंबई व NRB बेअरिंग लिमिटेड यांच्या संयुक्त माध्यमातून त्यांना अशा शेती साठी मदत करण्यात आली. त्यामध्ये ओपनवेल इलेक्ट्रिक पंप, पेट्रोल इंजिन, स्प्रे पंप, HDPE पाईप अशी गरज असलेली साधने होतकरू महिलांना देण्यात आली. वराड ता.मालवण या गावातील एकूण 23 लाभार्थी शेतकरी महिलांना याचा लाभ देण्यात आला.
सध्या अन्न सुरक्षा ची चर्चा आहे त्याही पेक्षा महत्त्वाचे असते सुरक्षित अन्न. गावात तयार होणारे. नैसर्गिक मिनरल वॉटर ने पिकवले गेलेले,खऱ्या अर्थाने ब्रँडेड. हा कार्यक्रम रोटरी क्लब माहीम मुंबईच्यावतीने वराड गावात पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी माहीम मुंबई अध्यक्ष विदुला शिरसागर, वर्षा परुळेकर (असिस्टंट govt. Rotary district ३१४१., पेडणेकर मॅडम रोटरी सदस्य, रश्मी पाटील, डॉ.प्रसाद देवधर भगीरथ प्रतिष्ठान, व्हिक्टर डॉन्टस संचालक सिंधुदुर्ग बँक. शलाका रावले.सरपंच वराड,उद्योजक समीर रावले . तसेच गावातील शेतकरी वर्ग महिला शेतकरी लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सरपंच शलाका रावले तसेच शेतकरी महिलांनी गावच्या वतीने रोटरी सदस्यांचे मान्यवरांचे,आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रश्मी पाटील यांनी केले.