
कुडाळ- आकारीपड जमिनीतून सर्व वर्ग केलेल्या जमिनीपासून जी आकारीपड जमिन शिल्लक राहते ती 1 हजार 765.07 एकर जमीन मधून माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्या या हेतूनेच हा प्रश्न सुटावा सतत पाठपुरावा केला अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार निलेश राणे यांनी देत मराठवाड्यात अतिवृष्टी नंतर एनडीआरएफच्या निकषानुसार मराठवाड्यातील, शेतकऱ्यांना मदत दिली त्याच एनडीआरएफच्या निकषानुसार कोकणातील शेतकरी मच्छीमार या नुकसानग्रस्तांना मिळावी यासाठी, शासनाकडे प्रयत्न करणार आहे असे ही त्यांनी सांगितले.
कुडाळ येथे आमदार राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, गटनेता विलास कुडाळकर, शहर प्रमुख अभिषेक गावडे, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पाच टक्क्यांनी जमीन मिळणार आहे असे पत्रकार परिषदेत आमदार निलेश राणे यांनी सांगत पावसामुळे भरलेल्या शेतकऱ्यांना तसेच मच्छीमार व्यवसाय पावसामुळे ची शेतकरी झाली आहे त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात साठी असे सांगितले १९ मे २०२५ या आकारीपड जीआर नुसार काही सरकारी दरबारात आकारीपड जमीन वगळण्यात आली यामुळे शेतकरी तसेच काहींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
मात्र याबाबत कोणीही संभ्रम निर्माण करू नये कारण काही महिन्यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सह्याद्री विश्राम गृह मुंबई येथे कोकणातील महसूल प्रश्नां बाबत आयोजित केलेल्या बैठकीत आकारीपड प्रश्न आकड्यासह मांडला होता. या बाबत मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांकडून तात्काळ अहवाल ही मागितला होता. त्यानंतर कोकण दौऱ्यावर आलेले राज्यमंत्री योगेश कदम यांनाही याबाबत माहिती दिली होती त्यांनी या प्रश्न आढावा घेतला होता.
गेली दहा वर्ष या आकारीपड प्रश्न सुटावा म्हणून कोणीच लक्ष दिले नव्हते मी मात्र प्रामुख्याने हा प्रश्न सुटावा माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्या या हेतूनेच हा प्रश्न सुटावा सतत पाठपुरावा केला.
१९ मे चा हा जीआर पहिले पाऊल आहे, आता दूसरे पाऊल कलम १८२ नूसार गेल्या पाच वर्षात ज्यांनी अर्ज केला होता त्यांना जमिनी मिळणार व तर या जमिनी मिळविण्यासाठी २५ टक्के रक्कम बाजार भावाने द्यावी लागणार होती. आता मात्र कलम 220 नुसार ही रक्कम 5 टक्के बाजारभावाने द्यावी लागणार आहे त्यामुळे हे शेतकऱ्यांना नक्कीच परवडण्या सारख आहे.
जिल्ह्यातील आकारीपड जमिनी पैकी 269 जमीन पुनरवसनासाठी आहे ती वेगळी आहे, २५४० एकर ही वनाविभागाची जमिन आहे. या सर्व वर्ग केलेल्या जमिनीपासून जी आकारीपड जमिन शिल्लक राहते ती 1765.07 एकर जमीन असून या जीआर च्या, माध्यमातून ही जमीन शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आम्ही कार्यरत असणार आहोत हे आमचं दुसरं पाऊल आहे त्यामुळे असं कोणी समजू नये की हा जीआर आपल्याला लागू होत नाही तर हा जीआर आपला आपल्याला लागू होतो. कारण 1765.07 एकर जमीन ही शासनाकडून आपण वगळणार आहोत.
संपूर्ण महाराष्ट्रात ४८०० आकारीपड जमिनी , शासन निर्णयानुसार देण्यात आल्या त्याच धर्तीवर आपल्या जिल्ह्यातील 1765.07 जमिनी येथील शेतकऱ्यांना मिळू शकतात असा प्रस्ताव व मागणी मी यापूर्वी दोन्हीही महसूल मंत्र्यांना केलेली असून लवकरात लवकर ही जमीन वगळून आणणार या जीआराद्वारे हे प्रयत्न नाही तर शंभर टक्के आणणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला कारण आपल्याकडे जीआर चा आधार आहे. नाहीतर येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहे असे त्यांनी सांगितले. लांबलेल्या पावसामुळे कुडाळ मालवण या मतदार संघात जे नुकसान झालं आहे मालवण तालुक्यात भात, भुईमूग, नाचणी पिक पाहता मालवण तालुक्यात ९५०० एकर जमीन क्षेत्र आहे. तर कुडाळ तालुक्यात 13550 एकर जमीन क्षेत्र आहे. अजून येतील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व पिक सडले आहे तर काही पिकांना कोंब आलेले आहेत. तर मालवण तालुक्यात 4500 एकर आंबा, काजू 850 एकर क्षेत्र आहे. तर कुडाळ तालुक्यात आंबा 3375 काजू लागवड 12497 एकर जमीन क्षेत्र आहे, या पिकांवरही पावसाचा परिणाम झाला आहे अजून ही मोहोर आलेला नाही, मोहोर कधी येईल सांगता येणार नाही जर मार्च नंतर मोहोर आला तर मोठ्या प्रमाणात आंबा व्यवसाय काजू व्यवसायिकांचे नुकसान आहे. उशिरा मोहोर आला व मे महिन्यात पाऊस आला तर काही ठिकाणी पीकच येणार नाही अशीही परिस्थिती शेतकऱ्यांवर उद्भवू शकते.
तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मच्छीमार यांचे नुकसान झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जा नोंदणीकृत मासेमारी बोटी 3561 आहेत. त्यामध्ये वॉटर स्पोर्ट, किल्ले प्रवासी सर्विस व या वर जे किनारपट्टीवरील लोक अवलंबून आहेत, मासेमारी बंद आहे अजूनही पाऊस पडत आहे त्यामुळे किमान मच्छीमारांचे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर वॉटर स्पोर्ट्स किल्ला सर्विस व या आधारावर असलेल्या लोकांचे रोजची उलाढाल पाहता सुमारे 12 ते 13 कोटी पर्यंत नुकसान झाले आहे. त्यामुळे हे 25 कोटी आर्थिक नुकसान झालेले आहे.
याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता जी मदत दिली जाते ती एन डी आर एफ च्या निकषानुसार दिली जाते . मराठवाड्यात अतिवृष्टी नंतर एनडीआरएफच्या निकषानुसार मराठवाड्यातील, शेतकऱ्यांना मदत दिली त्याच एनडीआरएफच्या निकषानुसार कोकणातील शेतकरी मच्छीमार या नुकसानग्रस्तांना मिळावी यासाठी मी आग्रही आहे.
नुकसान झाले बाबत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्र मी अगोदरच दिले आहे, आता त्यांची भेट घेवून कोकणात पडणाऱ्या पावसाबाबत तसेच होणाऱ्या नुकसान याबाबत जाणीव करून देऊन देणार आहे असे सांगितले.
उष्णता, पाऊस यामुळे कोकणात होणाऱ्या नुकसानीबाबत वेगळी विशेष पॉलिसी नेमण्याकरता मी येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे असेही त्यांनी सांगितले
शेती, तसेच इतर झालेल्या नुकसान झाले त्याचे 40 ते 50 टक्के पंचनामा झाला असून लवकरच 100 टक्के पंचनामे पूर्ण होतील असे ही त्यांनी सांगितले.











