येता संकट बालकावरी १०९८ मदत करी

Edited by:
Published on: August 23, 2024 15:20 PM
views 121  views

सिंधुदुर्गनगरी : आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी लैंगिक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल यासाठी कुठे संपर्क करावा या बाबत सामान्य नागरिकामध्ये संभ्रम असतो.

अशा संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता भारत सरकार महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागामार्फत ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत/संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकाना २४û७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. या निवेदनाद्वारे १०९८ या टोल फ्री क्रमाकावर वर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रंशात नारनवरे यांनी केले आहे.