बांदा शहराला मुसळधार पावसाने झोडपले

Edited by:
Published on: May 19, 2024 14:05 PM
views 228  views

बांदा :  बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी मुसळधार पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. सायंकाळी ५ वाजता विजांच्या गडगडाटासह पावसास सुरुवात झाली. आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते.

सायंकाळी तब्बल दोन तास पावसाने झोडपून काढले. बांदा शहरसह परिसरातील ग्रामीण भागात देखील पूर्व मोसमीच्या सरी कोसळल्या. ग्रामीण भागातील अनेक गावात मुसळधार पाऊस झाल्याने हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या आंबा, काजू पिकांवर याचा परिणाम झाला आहे.