
वैभववाडी : तालुक्यात आजही मुसळधार पाऊस झाला. भुईबावडा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. खारेपटण-भुईबावडा मार्गावर उंबर्डे वाणीवाडी येथे मोरीवर पाणी आले होते. तसेच कुसुर सुतारवाडी येथेही रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे यामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.
तालुक्यात सायंकाळी ३.३० वाजल्यापासून वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. भुईबावडा परिसरात आज जोरदार पाऊस झाला. उंबर्डे वाणीवाडी येथील मोरीवर पाणी आले होते. यामुळे खारेपटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच कुसुर सुतारवाडी येथेही रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे भुईबावडा भागात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. या मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने रस्त्यावरील पाणी ओसरण्यास विलंब होणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवासी यामुळे वाहनांमध्ये अडकून आहेत. सुमारे तासभर वाहतूक बंद आहे.