सोसाट्याच्या वाऱ्यासह मालवणात मुसळधार

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 18, 2023 19:26 PM
views 166  views

मालवण : सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने मालवणला झोडपून काढले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. बागायत पुलानजीक  मुख्य रस्त्यावर पाणी आले आहे. तर या पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या असून हजारो रुपयांची हानी झाली आहे. यामध्ये हडी येथील गणपत नारायण चव्हाण यांच्या घरावर झाड पडून घराचे १८ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. तर आंबडोस येथील व्हाळवाडी जिल्हा परिषद शाळेची  संरक्षक भिंत कोसळून १० हजाराचे नुकसान झाले आहे.