
देवगड : देवगड मध्ये पावसाने जोरदार सुरूवात केली असून देवगड साटमवाडी येथील विहीर कोसळून त्या विहिरीच्या शेजारून जाणारा रस्ताही खचण्याची भीती निर्माण झाली आहे.पाऊस सुरू झाल्या नंतर प्रथमच पावसाने १५० चा टप्पा ओलांडला असून देवगड मद्ये १५८ येवढ्या मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर कावलेवाडी मार्गावर झाड पडून एक तास वाहतूक ठप्प झाली होती.
देवगडात शनिवार पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली.या पावसामुळे कावलेवाडी रोडवरील खान यांच्या दुकाना शेजारील असलेले झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने रात्री अकरा वाजल्यापासून वाहतूक ठप्प होती. सकाळी नगरसेविका स्वरा कावले यांनी नगरपंचायत मध्ये याबाबतची माहिती दिल्यानंतर नगरपंचायत कर्मचारी यांनी तात्काळ तिथे येऊन ते झाड हटविले व मार्ग वाहतुकीस खुला केला.तसेच साटमवाडी येथील दत्ता जोशी यांच्या परड्यातील विहिरीचा काही भाग कोसळल्याने विहिरी नजीकचा रस्ता ही खचण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. पहिल्याच पावसात होणारी ही पडझड प्रशासनाचा लक्ष्य वेधनारी ठरणार आहे.