
मंडणगड : तालुक्यात सातत्याने पडत असलेल्या पावासामुळे 3 गावांमध्ये घरांची पडझड झाल्याने 1 लाख 70 हजार 240 रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती तहसिल कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. 19 ऑगस्ट 2025 रोजी तालुक्यात 130.80 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली (19) ऑगस्ट अखेर तालुक्यात 2211.80 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
वार्षिक सरासरीच्या 60.12 टक्के इतका पाऊस पडून गेला आहे. गतवर्षी याच दिवशी तालुक्यात 2802.70 मिलीमीटर पाऊस पडून गेला होता व वार्षिक सरासरी 71.92 टक्के इतकी होती. पावसामुळे मौजे लाटवण येथील चंद्रा मोतीराम जाधव यांच्या घराची पुर्णतः पडझड होऊन अंदाजे 1 लाख 30 हजार रुपयांचे नकसान झाल्याचे नुकसानीचा पंचनामा महसुल विभागाने पुर्ण केला आहे. गोठे येथील मिनेश मिलिंद जाधव यांच्या कच्चा घराची अंशतः पडझड झाल्याने अंदाजे 24 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसुल विभागाने पुर्ण केला आहे.
नारायण नगर येथील विजय भिकू भोगल यांचे घराची अंशतः पडझड झाल्याने अंदाजे 16 हजार 240 रुपयांचे नुकसान झाले असून महसुल विभागाने नुकसानीचा पंचनामा पुर्ण केला आहे. पाऊस व पडझडीच्या कारणामुळे तालुक्यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. ग्रामिण भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसुल विभागाचेवतीने सुरु आहे.