
वेंगुर्ला : दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील जैतीर उत्सवाला आज पासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त सकाळपासून भाविकांनी श्री देव जैतीराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे भविकांसाहित, दुकान व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे.
या जैतीर उत्सवात घडघडाटासहित जोरदार पावसाने हजेरी लावली. या जैतीर उत्सवाच्या निमित्ताने अनेक दुकाने मंदिर परिसरात थाटण्यात आली आहेत. या अचानक आलेल्या पावसामुळे या दुकान व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे.