दोन कारमध्ये जोरदार धडक !

Edited by: विनायक गावस
Published on: September 21, 2023 16:55 PM
views 293  views

सावंतवाडी : खामदेव नाका येथे भरधाव वेगात येणाऱ्या कारने पुढच्या कारला दिली जोरदार धडक दिली. मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने पुढच्या कारला ही जोरदार धडक दिली.

या अपघातात पुढे असणाऱ्या कारमधील महिला व ११ महिन्याच्या बाळाला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात १ वाजण्याच्या सुमारास घडला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.